मुंबई: निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी येथे क्रुझ टर्मिनल उभारण्यात येणार असून, भाईंदर-वसई तसेच अर्नाळा- टेंभीखोडावे दरम्यान लवकरच रो-रो सेवा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी गुरुवारी केली. रो-रो सेवेमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल त्याचबरोबर वेळ आणि पैशाचीही बचत होईल, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा >>> वाढवण बंदरामुळे विकासाला चालना; केंद्रीय बंदर विकासमंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा विश्वास

rockfall protection at Saptshringi Ghat Nanduri Ghat road
नांदुरी-सप्तश्रृंगी गड रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Bed Sheet production in Solapur
सोलापूरच्या चादर व्यवसायाचे पानिपत!
jj hospital stipend
जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांचे विद्यावेतन रखडले, निवासी डॉक्टर मानसिक तणावाखाली
nadi tarangini latest news in marathi
‘नाडी तरंगिणी’द्वारे अचूक नाडी परीक्षा! पुण्यातील नवउद्यमीने विकसित केले डिजिटल उपकरण
Suvarnadurga Fort marathi news
दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
Swami Kevalananda Saraswati Narayanashastri Marathe the founder of Prajnapathshala
तर्कतीर्थ विचार: गुरू : स्वामी केवलानंद सरस्वती
Ratna Pathak Shah
संदूक: अभिनयाचा श्रीगणेशा

‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’मधील ‘बंदरांतून बदलाकडे: महाराष्ट्राच्या प्रगतीगाथेचा मागोवा’ या चर्चासत्रात बोलताना डॉ. गुरसळ यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. गोवा राज्यातील पर्यटन तसेच तळ कोकणातील पर्यटनात फरक आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पर्यटनाला अधिक वाव असून त्यासाठी रत्नागिरी येथे सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून क्रूझ टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सागरमला प्रकल्पांतर्गत केंद्राकडून ५० टक्के अर्थसहाय्य मिळणार असल्याचे डॉ. गुरसळ यांनी सांगितले.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर भाईंदर ते पालघरदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांना मोठया वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या भागातील लोकांना दिलासा देण्यासाठी भाईंदर- वसई तसेच अर्नाळा ते टेंभीखोडावे दरम्यान रो-रो सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना सुविधा मिळण्याबरोबरच वेळ आणि पैशांचीही बचत होईल, असे डॉ. गुरसळ यांनी सांगितले.

हेही वाचा >>> वाढवण बंदराला ३१ जुलैपर्यंत परवानगी – संजय सेठी

वॉटर मेट्रो टॅक्सी प्रकल्प सुरू करण्यासाठी केरळमधील तज्ञांची मदत घेण्यात येत असून त्यासाठी जागतिक निविदा काढण्यात येणार आहेत. बंदर विकासासाठी ठिकाणनिहाय निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असून बेलापूर येथील जेटी विकसित करण्याची प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वासही डॉ. गुरसळ यांनी व्यक्त केला.

सागरी किनारा भागात बंदर वा पर्यटन प्रकल्प उभारताना पर्यावरणाच्या परवानग्या मिळविण्याचे आव्हान असते. तिवरांचे जंगल असेल तर  अनेकदा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र आता अशा परवानग्या लवकर मिळाव्यात यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे सहा महिने ते वर्षभरात संबंधित परवानग्या मिळण्याच्या दृष्टीने कार्यपद्धती अवलंबण्यात येत असल्याचे डॉ. गुरसळ यांनी सांगितले.

मुंबईतील रेडिओ क्लबचे नूतनीकरण

रत्नागिरी, मालवण परिसरात हाऊस बोट प्रकल्पांना चालना देण्यात येत असून मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळील रेडिओ क्लबचे २२० कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेप्रू्वी या कामाचे कार्यादेश काढण्याचा प्रयत्न आहे, असे डॉ. गुरसळ यांनी सांगितले.

हरित इंधनाच्या दृष्टिकोनातून बंदर विकास

’ हरित इंधनाच्या दृष्टिकोनातून बंदर विकसित करण्याचा विचार केला जात आहे. बंदर विकसित करण्याबरोबर किनाऱ्यापासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्ते विकसित करणे आवश्यक आहे, असे डॉ. गुरसळ  म्हणाले.

’ बंदर विकासासाठी येणाऱ्या उद्योजकांना साह्य करण्यासाठी मैत्री या एक खिडकी प्रणालीचा वापर केला जात आहे. ’ गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तर कोकणात, दक्षिण कोकणात समुद्रातील स्थिती वेगवेगळी आहे. या ठिकाणांचा विकास करण्यासाठी वेगवेगळया स्वरूपाचे प्रकल्प राबविणे आवश्यक असल्याचेही डॉ. गुरसळ यांनी नमूद केले.

Story img Loader