संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल) क्रिकेट स्पध्रेतील स्पॉट-फिक्सिंग अणि सट्टेबाजी प्रकरणी शनिवारी मुंबई गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रामध्ये ४६ आरोपी, ६१ पंचनामे यांचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्जचा व्यवस्थापकीय सदस्य गुरुनाथ मय्यपन याच्यासह अभिनेता विंदू दारा सिंग आणि पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर जुगार, सट्टेबाजी, कारस्थान रचणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपपत्रातील पाकिस्तानी सट्टेबाज अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित आहेत. परंतु दाऊदच्या प्रत्यक्ष सहभागाचे पुरावे सापडलेले नसल्याने त्याचे आरोपपत्रात नाव नाही. – वृत्त १४
*गुन्हे शाखेने सट्टेबाज, गुरुनाथ मय्यपन, असद रौफ, विंदू दारा सिंग यांच्या मोबाइलच्या संभाषणाची नोंदणी केली. त्यातून महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.
*१५ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यापूर्वी असद रौफने विंदूला फोन करून ‘आज जिंदगीकी हार जित करलो, जितना चाहे पैसा लगालो, मुंबई जितने वाली है..’ असे सांगितले. या सामन्याला कार्यरत असलेल्या रौफचे काही निर्णय वादग्रस्त ठरले होते. हा सामना मुंबईने जिंकला होता.
*१२ मे रोजी चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यापूर्वी  गुरुनाथ मय्यपन याने विंदूला फोन करून आमचा संघ १३० ते १४० धावा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार विंदूने सट्टा लावला. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज हरला होता. त्यामुळे चेन्नईच्या खेळाडूंचाही यात सहभाग असण्याची शक्यता आहे.
*मय्यपन हा विंदूला माहिती पुरवायचा आणि सट्टा लावायचा. मात्र विंदूने सुरुवातीला मय्यपनला काही पैसे जिंकवून दिले, नंतर मय्यपन हरत गेला. संपूर्ण आयपीएलमध्ये तो सुमारे एक कोटी रुपये हरला होता.

Story img Loader