लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : सीएसएमटी येथे बेस्ट बसच्या चाकाखाली चिरडून ५५ वर्षीय हसईनार अंदून्ही या व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला होता. पादचाऱ्याला दुचाकीने धडक दिल्यामुळे तो खाली कोसळून बसच्या मागच्या चाकाखाली आल्याची माहिती उघड झाली होती. त्यानंतर माता रमाबाई आंबेडकर (एआरए) मार्ग पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दुचाकीस्वाराचा शोध घेतला आहे. त्याच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीएसएमटी परिसरातील भाटीया जंक्शन येथे बुधवारी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. मृत व्यक्तीने पांढरा शर्ट व लुंगी परिधान केली होती. हसईनार अंदून्ही अशी मृत व्यक्तीची ओळख पटली होती. ते मूळचे केरळ येथील रहिवासी होते. तेथे छोटा-मोठा व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवायचे. भाटीया जंक्शन येथे अंदून्ही यांना दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा तोल गेला व ते खाली कोसळले आणि बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली सापडले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आणखी वाचा-चेंबूरमध्ये पालिकेने खोदलेल्या खड्यात पडून इसमाचा मृत्यू, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

पोलीस परिसरातील सीसीटीव्ही चित्रिकरणाची तपासणी करत असून त्याद्वारे दुचाकीस्वाराचा शोध सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या तपासणीत पोलिसांना दुचाकीचा क्रमांक मिळाला. त्या माहितीच्या आधारे आरोपी दुचाकीस्वार डोंगरी परिसरात गेल्याचे समजले. त्यानुसार त्याला डोंगरी येथील चिंचबंदर येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी दुचाकीस्वाराचे नाव मोहम्मद साहिल सिद्दीकी (२०) असून त्याच्याविरोधात भरधाव वेगाने दुचाकी चालवून मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आणखी वाचा-कुर्ला बस अपघात: मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल

अपघातानंतर अंदुन्ही यांचा मृतदेह सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आला होता. याप्रकरणी बेस्ट बस चालक ज्ञानदेव जगदाळे यांचीही पोलिसांनी चौकशी केली असून मृत व्यक्तीला दुचाकीने धडक दिल्यामुळे ती व्यक्ती मागच्या चाकाखाली आल्याचे त्यांनी सांगितले होते. संबंधीत बस अणुशक्ती नगर येथून कुलाबा येथे जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने गुरूवारी त्याला पकडण्यात आले.