मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी सुविधेसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सीएसएमटी – नागूपर, सोलापूरदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.मध्य रेल्वेवरील सीएसएमटी – नागपूर अतिजलद एकमार्गी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०२१०३ सुपरफास्ट एकेरी विशेष गाडी २ डिसेंबर रोजी सीएसएमटी येथून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता पोहोचेल.
या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात येणार आहे. या रेल्वेगाडीला एकूण १७ डबे असून एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी अशी संरचना असेल.सीएसएमटी – सोलापूर अतिजलद एकमार्गी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०२१०५ एकेरी विशेष रेल्वेगाडी ३ डिसेंबर रोजी सीएसएमटी येथून रात्री १२.३० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी सकाळी ८.१० वाजता पोहोचेल.