आयपीएलमधील सट्टेबाजीच्या रॅकेटवरून अटकेत असलेला चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मयप्पन, अभिनेता विंदू दारा सिंग, सट्टेबाजांचे आर्थिक व्यवहार करणारा अल्पेशकुमार पटेल आणि प्रेम तनेजा यांना मुंबईतील महानगरदंडाधिकाऱयांनी मंगळवारी जामीन मंजूर केला.
या चौघांनाही २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. चौघांनाही एक दिवसाआड मुंबईतील गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यांचे पासपोर्टही जप्त करण्यात आले आहेत. सर्व प्रक्रिया केल्यानंतर या चौघांची मंगळवारी संध्याकाळी सुटका करण्यात येण्याची शक्यता आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर सोमवारीच महानगरदंडाधिकाऱयांनी या चौघांना १४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर चौघांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केले होते.

Story img Loader