मुंबई : बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई विमानतळ – कफ परेड मार्गावर गुरुवारपासून मोबाइल ॲप आधारित आसन आरक्षित करणारी बेस्टची प्रीमियम बस सेवा सुरू केली. या  सेवेला प्रवाशांचा काही प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बेस्ट उपक्रमाने मोबाइल ॲप आधारित आसन आरक्षित करता येणारी वातानुकूलित विजेवर धावणारी प्रीमियम बस सेवा १२ डिसेंबरपासून ठाणे – वांद्रे कुर्ला संकुल आणि वांद्रे कुर्ला संकुल – वांद्रे स्थानकादरम्यान सुरू केली. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई विमानतळ – दक्षिण मुंबई मार्गावरही प्रीमियम बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. त्यानुसार गुरुवारपासून कफ परेड – मुंबई विमानतळ प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात आली.

हेही वाचा >>> मुंबईत नवी जीवनवाहिनी, मेट्रोचे ४५.५१ कि.मी. लांबीचे नवे जाळे आकाराला

सकाळी ७ वाजल्यापासून दर एक तासांनी ही बस प्रवाशांना उपलब्ध करण्यात येणार आहे. या बसमधून मुंबई विमानतळ – कफ परेडदरम्यानच्या प्रवासासाठी २५० रुपये मोजावे लागणार आहेत. वांद्रे कुर्ला संकुल, वरळी सी फेस, मरिन ड्राइव्हमार्गे प्रीमियम बस धावेल, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>> पिंपरी चिंचवडमधील शाळांमध्ये उर्दू शिक्षकच नाहीत, जनहित याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल

कफ परेड – मुंबई विमानतळ मार्गावरील तिकीट दर

मुंबई विमानतळ – वांद्रे कुर्ला संकुल : १५० रुपये

मुंबई विमानतळ वरळी सी फेस : १९० रुपये

मुंबई विमानतळ – मरिन ड्राईव्ह : २३५ रुपये

मुंबई विमानतळ – कफ परेड : २५० रुपये

तर या मार्गावर प्रीमियम बसने वांद्रे कुर्ला संकुल – मरिन ड्राईव्ह प्रवास करण्यासाठी १७० रुपये, तर कफ परेड पर्यंतसाठी २१० रुपये मोजावे लागतात.