बेस्ट कामगारांच्या बोनसबाबत शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र यासंदर्भात कोणताही मुद्दा समितीपुढे प्रशासनाकडून मांडण्यात आलेला नाही. गेली दोन वर्षे बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना दिवाळीवेळी केवळ उचल देण्यात येते. त्यानंतर ही रक्कम पगारातून कापून घेतली जाते. बेस्ट परिवहन विभागाची आर्थिक स्थिती डळमळीत असल्याने बोनसचा भार पेलवणारा नाही, असे बेस्ट प्रशासनाकडून गेली दोन वर्षे सांगण्यात आले. किमान यावर्षी तरी बोनस मिळेल, अशी कर्मचाऱ्यांना आशा आहे. त्यातच गुरुवारी पालिकेतील कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत बोनसबाबत निर्णय होण्याची अपेक्षा होती. मात्र अखेरपर्यंत बोनसचा विषय चर्चेला आला नाही.

Story img Loader