मुंबई : सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहा, आपल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून भेटीगाठी वाढवण्याच्या सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. तसेच लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून येत्या २५ ऑगस्टपासून सदस्य नोंदणी सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाठीच्या दुखण्यातून बरे झाल्यानंतर ठाकरे यांनी आज रवींद्र नाटय़ मंदिरात कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये सर्वच जागा आपण स्वबळावर कशा लढू शकतो याची चाचपणीही करण्याच्या सूचना राज ठाकरेंनी दिल्याचे समजते. मंगळवारी ठाकरे इतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

 पक्षाच्या पुणे ग्रामीणमधील तीन लोकसभा मतदारासंघांसाठी पक्ष निरीक्षक पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून पुणे ग्रामीणमधील मावळ, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारासंघांतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यात मावळ लोकसभा मतदारसंघात किशोर शिंदे, हेमंत संभूस आणि गणेश सातपुते यांची पक्ष निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदावर अजय शिंदे आणि बाळा शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बारामतीमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून वसंत मोरे, सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Current unstable political conditions see it as an opportunity says mns chief raj thackeray zws