मोनोरेल मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत महादेव पालव मार्गावर २० खांबांचे बांधकाम करण्यात येणार असल्याने शुक्रवारपासून करी रोड रेल्वेस्थानकावरील पूल वाहतुकीसाठी बंद होणार आहे. पावसाळय़ापर्यंत वाहनधारकांनी एलफिन्स्टन रोड, चिंचपोकळी आणि एस पुलाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केले आहे.
चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या सुमारे २० किलोमीटरच्या मार्गावर मोनोरेल धावणार आहे. चेंबूर ते वडाळा हा नऊ किलोमीटरचा पहिला टप्पा असणार आहे. तर वडाळा ते महालक्ष्मीजवळील संत गाडगेमहाराज चौक असा दुसरा टप्पा आहे.
मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यावर चाचण्या यशस्वी झाल्या. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
मोनोरेलच्या कामासाठी करी रोडचा पूल बंद
मोनोरेल मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत महादेव पालव मार्गावर २० खांबांचे बांधकाम करण्यात येणार असल्याने शुक्रवारपासून करी रोड रेल्वेस्थानकावरील पूल वाहतुकीसाठी बंद होणार आहे. पावसाळय़ापर्यंत वाहनधारकांनी एलफिन्स्टन रोड, चिंचपोकळी आणि एस पुलाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केले आहे.
First published on: 13-12-2012 at 03:55 IST
TOPICSमोनोरेल
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curry road bridge closed for monorail work