मुंबई : संयुक्त अरब अमिराती येथून तस्करी करून आणलेली ११२ टन सुपारी सीमाशुल्क विभागाने जप्त केली आहे. नवी मुंबईतील न्हावा-शेवा बंदरात १० कंटेनरमध्ये ही सुपारी सापडली. गेल्या १० दिवसांत न्हावा-शेवा बंदरातून ३०० मेट्रिक टनाहून अधिक सुपारी जप्त करण्यात आली असून त्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुपारीच्या आयातीवर भारतात मोठ्या कर आकारण्यात येत असल्यामुळे काही टोळ्या सुपारी तस्करीत सक्रिय झाल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे न्हावा-शेवा बंदरात एक विशेष मोहीम राबविण्यात आली. माहितीच्या आधारे बंदरातील अनेक कंटेनरची तपासणीत करण्यात आली. त्यापैकी १० कंटेनरमध्ये तस्करी करून सुपारी आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा…बॉम्बस्फोटातील दोषीला किती काळ एकांतात ठेवणार ? जर्मन बेकरी स्फोटातील आरोपीबाबत उच्च न्यायालयाची तुरुंग प्रशासनाला विचारणा

कर चुकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुपारीची तस्करी करण्यात येते. सीमाशुल्क विभागाने गेल्या १० दिवसांत न्हावा शेवा बंदरातून ३०० मेट्रीक टनाहून अधिक सुपारी जप्त केली आहे. त्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे.

डांबराच्या नावाखाली तस्करी

सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डांबर आणि गळती रोखणाऱ्या इतर वस्तूंच्या मागणीत वाढ झाली आहे. आरोपी याचाच फायदा घेऊन डांबराच्या नावाखाली सुपारीची तस्करी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याकडे पान मसाल्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. परदेशातून कायदेशीररीत्या सुपारीची आयात केल्यास ११० टक्के वस्तू व सेवा कर द्यावा लागतो. त्यामुळे सुपारीची किंमत दुपटीनेही वाढते. परिणामी, कर चुकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुपारीची तस्करी करण्यात येते.

हेही वाचा…मुंबई : पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार, २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांकडून प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी

वापी येथून आरोपीला अटक

सीमाशुल्क विभागाने गेल्या १० दिवसांत न्हावा-शेवा बंदरातून ३०० मेट्रिक टनाहून अधिक सुपारी जप्त केली आहे. याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे. त्या प्रकरणात मुख्य आरोपी मुकेश भानुशाली याला गुजरातमधील वापी येथून अटक करण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Customs seize 300 tonnes of smuggled betel nuts worth rs 15 crore at nhava sheva port key accused arrested mumbai print news psg