लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहारात बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून ७६ वर्षीय वृद्धाची सव्वादोन कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
fraud of rs 15000 crores in state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर
Moneyedge Group financial scandal news in marathi
१०० कोटींच्या फसवणुकीबद्दल तक्रार ‘मनीएज’च्या दोन संचालकांना अटक; ‘टोरेस’नंतर आणखी एक घोटाळा
14 year old girl pregnant loksatta news
Nagpur Crime News: १४ वर्षांची मुलगी तीन महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध गुन्हा
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक

दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोड परिसरात ७६ वर्षीय व्यक्ती पत्नीसोबत राहतात. तक्रारीनुसार, ११ एप्रिल रोजी व्हॉट्स ॲपवर त्यांना दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने वांद्रे गुन्हे शाखेतून संदीप राव बोलत असल्याचे सांगितले. आधारकार्डवरून कोणीतरी सिमकार्ड घेतले असून त्यांना आधारकार्ड पाठवण्यास सांगण्यात आले. त्यांनी आधारकार्डची दुय्यम प्रत आणि काही कागदपत्रे तक्रारदाराला पाठवली. त्यात नरेश गोयल विरूद्ध दाखल आर्थिक गुन्ह्यांत त्यांचाही सहभाग असल्याचे नमूद होते. कागदपत्रे पाहून त्यांना धक्का बसला . तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या एका कागदपत्रातही त्यांचे नाव दिसले.

आणखी वाचा-मानखुर्दमध्ये ५५० विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अवघे दोन शिक्षक

अधिकाऱ्याने हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचे सांगून याबाबत कुणाकडेही वाच्यता करू नये असे बजावले. प्रत्येक एक – दोन तासांनी त्यांना संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली. संबंधितांनी १२ एप्रिल रोजी पुन्हा दुरध्वनी करून कागदपत्रांसह तयार राहण्यास सांगितले. तसेच सीबीआय अधिकारी आकाश कल्हारी पुढील तपास करणार असल्याचे सांगून त्यांचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यांनी, संबंधित क्रमांकावर संपर्क साधताच त्याने सर्व बँक खाती तपासावी लागतील असे सांगून बँक खात्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. चौकशीदरम्यान खात्यातील सर्व रक्कम अधिकाऱ्याने सांगितलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केली. तपास यंत्रणांची नावे घेऊन १२ एप्रिल ते २० एप्रिलदरम्यान त्यांना २ कोटी १८ लाख रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले.

आणखी वाचा-वीज खरेदीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात; परवानगीनंतरच प्रक्रिया राबविण्याचे आदेश

यावेळी, मुंबई गुन्हे शाखा, आरबीआय, सर्वोच्च न्यायालय, प्राप्तीकर विभाग, ईडी अशा विविध यंत्रणांच्या नावाचा वापर करून बनावट नोटीस पाठवून, नरेश गोयल गुन्ह्याशी संबंध असल्याचे भासवून ७६ वर्षीय तक्रारदाराचे बँक खाते रिकामे करण्यात आले. अखेर, काही दिवसांनी याबाबत तक्रारदाराने जवळच्या व्यक्तीला माहिती दिली. त्यांनी हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगून पोलिसांशी संपर्क साधण्यास तक्रारदारांना सांगितले. त्यांनी चौकशी करताच आरोपींनी नरेश गोयल यांच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तक्रारदारांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार, दक्षिण सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.

Story img Loader