लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : शेअर्समधील गुंतवणुकीच्या नावाखाली कंपनीच्या विक्री व्यवस्थापकाची ८८ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारे फसणवूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याप्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बँक खात्यातील व्यवहाच्या मदतीने याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
तक्रारदार खासगी कंपनीत विक्री व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी समाज माध्यमांवर एक जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीमधील लिंकवर त्यांनी क्लिक केले. त्यानंतर त्यांना प्रसिद्ध कंपनीच्या नावाच्या व्हॉटस ॲप समुहामध्ये सहभागी करण्यात आले. त्या समुहामध्ये शेअर्स खरेदी – विक्रीविषयी माहिती देण्यात येत होती. जून महिन्यात एका महिलने त्यांना संदेश पाठवून शेअर्स खरेदी – विक्रीच्या व्यवहारासाठी एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ॲप डाऊनलोड झाल्यानंतर केवायसी देखील झाले. एक महिला त्यांना वारंवार बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगत होती. त्यानुसार तक्रारदार ठराविक रक्कम त्या खात्यात जमा करीत होते. रक्कम पाठवल्यानंतर त्याना खरेदी केलेल्या शेअर्सवर फायदा झाल्याचे दिसत होते. या घटनेनंतर महिलेने तक्रारदारांना त्या समुहामधून बाहेर पडण्यास सांगितले आणि दुसऱ्या समुहामध्ये सामील केले.
आणखी वाचा-बोरिवली-विरार वाहतूक विस्ताराचा मार्ग मोकळा
महिलेने दिलेल्या सूचनेनुसार तक्राराराने एकूण ८८ लाख ५६ हजार रुपये ॲपमध्ये जमा केले. पैसे गुंतवल्यानंतर त्याने जमा झालेला नफा काढण्यासाठी महिलेला विनंती केली. ॲपवर जाऊन नफ्याची रक्कम कशी काढायचे याची माहिती तिने दिली. त्याने मिळालेल्या नफ्यातील काही रक्कम दोन वेळा काढलीही. ॲपवर त्याना एकूण ५ कोटी ११ लाख रुपये जमा झाल्याचे दिसले. कंपनीने शुल्क घेऊन बाकीची रक्कम खात्यात वर्ग करण्यास तक्रारदाराने सांगितले. तेव्हा एका व्यक्तीने आणखी ७० लाख रुपये भरण्यास सांगितले. ती रक्कम भरणे तक्रारदारांना शक्य नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने त्या कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा त्या नावाची एकही व्यक्ती तेथे कार्यरत नसल्याचे समजले. तसेच कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या टिप्स दिल्या जात नसल्याचे त्याना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.