मुंबईः सिम स्वॅपिंगद्वारे खासगी कंपनीच्या मालकाची फसवणूक करण्यात आलेली चार कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम वाचवण्यात मुंबई सायबर पोलिसांना यश आले. आरोपींनी कांदिवलीतील या व्यावसायिकाच्या खात्यातून साडेसात कोटी रुपये हस्तांतरित केले होते. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर दूरध्वनी केला असता चार तासांत ही रक्कम वाचवण्यात यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कांदिवली येथील खाजगी कंपनीच्या मालकांची सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेले चार कोटी ६५ लाख रुपये वाचवण्यात यश आले. ही रक्कम गोठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवार, २३ डिसेंबर रोजी कांदिवली येथील खासगी कंपनीच्या मालकाचे सिम स्वॅपिंगद्वारे आरोपींनी तक्रारदारांच्या कंपनीच्या नावे असलेल्या बँक खात्यामध्ये अनाधिकृतरित्या प्रवेश मिळवला आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावर रक्कम हस्तांतरित केली. त्यातील सात कोटी ५० लाख रुपये विविध बँक खात्यात वळवण्यात आले. याबाबत ई-मेलद्वारे माहिती प्राप्त झाल्यावर तक्रारदारांनी १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार नोंदविली.

हेही वाचा – नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभाग आठवडाभरापासून बंद

हेही वाचा – वृद्ध व्यक्तीची ३० लाखांची सायबर फसवणूक

१९३० सायबर हेल्पलाईन कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस हवालदार राउळ यांच्या पथकाने तात्काळ एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल करून संबधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या कार्यवाहीमुळे तक्रारदारांची सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्या रकमेपैकी चार कोटी ६५ लाख ६० हजार ४१ रुपये बँक खात्यात गोठवण्यात आले. चार तासांत सायबर पोलिसांनी ही रक्कम गोठवली.