लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: बँकेचा लोगो असलेले मोबाइल ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर ४३ वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून पावणेतीन लाख रुपये हस्तांतरित झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर भामट्यांनी खासगी बँकेच्या मोबाईल ॲप्लिकेशनशी साधर्म्य असलेले ॲप्लिकेशन तयार करून ही फसणूक केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
Shah Rukh Khan News
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक; ५० लाखांची मागितली होती खंडणी
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”

या प्रकरणातील ४३ वर्षीय तक्रारदार वांद्रे पश्चिम येथील रहिवासी आहेत. त्यांचा एलईडी लाईटचा व्यवसाय आहे. त्यांचे एका खासगी बँकेत खाते असून त्याच बँकेचे क्रेडिटकार्डही ते वापरतात. त्यांना ८ ऑगस्ट रोजी एक संदेश आला होता. त्यात त्यांच्या क्रेडिट कार्डवर ५,८९९ पाईट्स जमा असून ते रिडिम करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा असे संदेशात नमुद करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना बँकेचे चिन्ह असलेले एक ॲप्लिकेशन दिसले. त्यापुढे पाईंट रिडिम करण्यासाठी पुढील ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार तक्रारदार यांनी ते ॲप डाऊनलोड केले. त्यात कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक, जन्म तारीख, कार्ड समाप्त होण्याची तारीख अशी विविध माहिती विचारण्यात आली होती. तक्रारदारांनी ती भरल्यानंतर क्लेम नाव या पर्यांयावर क्लिक केले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर तीन व्यवहार झाल्याचे संदेश त्यांना आले.

आणखी वाचा-मुंबई: अनधिकृत पॅरामेडिकल व्यवसायींविरोधात महाराष्ट्र पॅरामेडिकल परिषद आक्रमक

तक्रारदारांनी ते व्यवहार केले नसल्यामुळे याबाबतची माहिती त्यांनी बँकेला दिली. त्यानंतर त्यांच्या खात्यावरील सर्व व्यवहार बंद करण्यात आले. पण तोपर्यंत आरोपीने दोन लाख ७६ हजार रुपयांचे व्यवहार करून रक्कम हस्तांतरित केली होती. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर वांद्रे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराच्या बँक व क्रेडिटकार्डवरील व्यवहारांची माहिती बँकेकडे मागण्यात आली असून त्याद्वारे पुढील तपास करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.