लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : कुख्यात गुंड दाऊदशी संबंधित गुन्ह्यांत अडकल्याचे भासवून व्यावसायिकाची सायबर फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या बँक खात्यातून झालेल्या व्यवहारांची माहिती घेण्यात आली असून त्या आधारे तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

तक्रारदाराचा ब्रॅड मार्केटिंगचा व्यवसाय असून ते कुलाबा परिसरात राहतात. त्यांना १७ मे रोजी स्काईवरून एका दूरध्वनी आला होता. त्यात समोरच्या व्यक्तीने आपण कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने तैवानवरून एक कुरियर आले असून त्यात लॅपटॉप, बनावट पारपत्र, क्रेडीटकार्ड व अमली पदार्थ असल्यामुळे ते विमानतळावर थांबवले आहे. तुमचा याप्रकरणाशी संबंध नसेल, तर तुम्ही याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार करा, तुम्हाला मी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलशी जोडत असल्याचे दूरध्वनीवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर एक सायबर सेलचा अधिकारी दूरध्वनीवर आला. त्याला व्यावसायिकाने आपण असे कोणतेही कुरियर मागवले नसल्याचे सांगितले. त्यावर या तोतया सायबर अधिकाऱ्याने व्हिडिओ कॉलवर आमच्याशी संपर्क साधा असे सांगितले.

आणखी वाचा-मुंबई : मतदान केंद्रातील चित्रीकरण समाज माध्यमांवर टाकणाऱ्याविरोधात गुन्हा

व्हिडिओ कॉलदरम्यान त्या तोतया सायबर अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून सर्व माहिती मिळविली. तसेच त्यांचा आधारकार्ड क्रमांकही घेतला. आधारकार्डची पडताळणी केल्याचे भासवल्यानंतर संबंधित आधारकार्ड क्रमांक विविध राज्यांमध्ये १२ ते १५ गुन्ह्यांशी जोडला गेला आहे. तसेच मोहम्मद इस्लाम नवाब मलिक यांच्याशी संबंधित असून याप्रकरणाचे धागेदोरे थेट दाऊदपर्यंत पोहोचले असल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदार घाबरले. त्यानंतर आरोपींनी सीबीआयच्या नावाने तक्रारदाराला एक नोटीस पाठवली. उपायुक्त दर्जाचा अधिकाऱ्याने तक्रारदाराशी संपर्क साधला. त्याने तुमच्या बँक खात्यात काळा पैसा असून ती रक्कम आरबीआयशी संबंधित बँक खात्यात पाठवण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने आरटीजीएसद्वारे दोन लाख ६२ हजार रुपये एका बँक खात्यात जमा केले.

आणखी वाचा-स्पर्धा परीक्षांची तयारी, प्रशासकीय सेवेबाबत थेट अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

आरोपीने आणखी तीन लाख रुपये तक्रारदाराला पाठवण्यास सांगितले. त्यावर आपल्याकडे पैसे नसल्याचे व्यावसायिकाने सांगितले. आरोपीने घरी कोणाकडून तरी घेऊन पाठवा, अन्यथा तुम्हाला अटक करावी लागेल, असे धमकावले. व्यावसायिकाने आईकडून तीन लाखांचा धनादेश घेतला. त्यानंतर त्यांनी परिचित वकिलाशी संपर्क साधला असता ही फसवणूक असल्याचे त्याने सांगितले. तक्रारदाराने सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींकडून आलेला व्हिडिओ कॉल बंद केला व कुलाबा पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.