लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : वायदे बाजारात (शेअर मार्केट) गुंतवणीच्या नावाखाली बनवट लिंक पाठवून कांदिवलीतील एका व्यावसायिकाची अज्ञात आरोपींनी सव्वा कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली आहे. याप्रकरणी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे.

minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Malegaon ed investigation 125 crore rupees scam
मालेगावातील कोटींच्या उड्डाणांची ईडी चौकशी
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
ca ambar dalal
अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार

तक्रारदार कांदिवलील महावीरनगर परिसरातील रहिवासी आहेत. त्यांची स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. जून महिन्यांत ते त्यांच्या घरी असताना त्यांना इन्स्टाग्रामवर वायदे बाजारातील मार्गदर्शनाबाबत एक जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर त्यांना एका व्हॉटसअप गटात सहभागी करून घेण्यात आले. त्या गटात रमन वर्मा हा ग्रुप अॅडमीनसह प्रमुख अधिकारी होता. त्याची कंपनी अधिकृत नोंदणी केलेली असून त्या माध्यमातून अनेकांनी बाजारात गुंतवणुक केल्याचे आरोपीकडून सांगण्यात आले होते. तसेच या गुंतवणुकीचा त्यांना चांगला परतावा मिळत आहे, असे भासविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनीही त्यांच्या कंपनीमार्फत शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करावी, त्यात त्यांना चांगला फायदा होईल असे रमन वर्माने सांगितले.

आणखी वाचा-ठाण्यातील कोरम मॉलच्या बेकायदा बांधकामावर हातोडा पडणार

त्यासाठी त्यांना एक बनावट लिंक पाठविण्यात आली होती. त्यावर क्लिक करुन तक्रारदाराने त्यांच्या नावाची नोंदणी करुन वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रे अपलोड केली होती. त्यानंतर त्यांच्या मोबाईवर एक पासवर्ड पाठविण्यात आला होता. ग्रुप अॅडमीनसह इतरांच्या सांगण्यावरुन त्यांनी शेअरमार्केटमध्ये जून ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत १ कोटी २२ लाख ५ हजार रुपये एका आयपीओमध्ये गुंतवले होती. मात्र आरोपींनी त्यांच्या मूळ रक्कमेसह नफ्याची रक्कम दुसर्‍या आयपीओमध्ये त्यांच्या संमतीविना हस्तांतरीत केली. त्यांनी खरेदी केलेल्या शेअरची परस्पर विक्री केली होती.

आणखी वाचा-संग्रही असलेल्या ऐंतिहासिक नाण्यांचे जतन करण्याबाबत मुंबई विद्यापीठ उदासीन

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मूळ रक्कमेसह नफ्याची सुमारे सव्वादोन कोटीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करण्याची विनंती केली होती. ही रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी त्यांना आधी काही रक्कम जमा करण्यास सांगितले. त्याशिवाय रक्कम हस्तांतरीत करण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर सायबर पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी ६१ (२), ३४० (२), ३३८, ३३६ (३), (२), ३१९ (२), ३१८ (४) भारतीय न्याय संहिता सहकलम ६६ (डी), ६६ (सी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रादाराच्या बँकेतून ज्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरीत करण्यात आली. त्या माहितीद्वारे तपासाला सुरूवात करण्यात आली आहे.