मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली अंधेरीमधील एका वयोवृद्ध महिलेची आठ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

६० वर्षांची वयोवृद्ध महिला अंधेरीतील लोखंडवाला परिसरात वास्तव्यास असून त्यांच्या मालकीची एक शिक्षण संस्था आहे. या महिलेला फेब्रुवारी महिन्यात समजा माध्यमावर शेअर बाजारात गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा कसा मिळविण्याबाबतची एक जाहिरात दिसली. ती लिंक उघडल्यानंतर तिला एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते. ग्रुपमध्ये सर्वेश श्रीवास्तव नावाची एक व्यक्ती शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीबाबत प्रशिक्षण देऊन त्यांना काही नोट्स पाठवत होता. त्यानेच शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून महिलेला जास्तीत जास्त परतावा देण्याचे आश्वसान दिले होते. या आमिषाला बळी पडून महिलेने त्याच्या सांगण्यावरून विविध शेअरमध्ये काही रक्कम गुंतवली. या गुंतवणुकीनंतर तिला फायदा होत असल्याचे दिसत होते. मात्र ही रक्कम तिला काढता येत नव्हती. रक्कम काढण्यासाठी अधिकाधिक पैसे गुंतवण्यास महिलेला सांगण्यात आले.

हेही वाचा – मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट

हेही वाचा – पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई

आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. पण तोपर्यंत महिलेने आठ लाख ६० हजार रुपये आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले होते. याप्रकरणी महिलेने ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader