मुंबई : वेगवेगळी शक्कल लढवून ऑनलाईन फसवणुकीतून नागरिकांचे पैसे लुटणाऱ्या चोरांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने दणका दिला. ५ ऑक्टोबर रोजी तब्बल एक कोटी रुपये वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. ही रक्कम तक्रारदारांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.गेल्या काही वर्षांमध्ये सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ झाली असून वेगवेगळी शक्कल शोधून नागरिकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. ऑनलाईन फसवणुकीपासून सावध करण्यासाठी मुंबई पोलिसांमार्फत वेगवेगळ्या उपाययोजना, तसेच उपक्रम राबविले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तसेच, वेळोवेळी जनजागृतीही करण्यात येत आहे. ऑनलाईन फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन १९३० ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ५ ऑक्टोबर रोजी अनेक मुंबईकर ऑनलाईन फसवणुकीला बळी पडले. सायबर चोरांनी वेगवेगळ्या प्रकरणातून तब्बल १ कोटी १ लाख ५८ हजार ७२७ रुपये लुटले. मात्र, नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यांनतर, पैसे वळते झालेल्या बँकांबरोबर संपर्क साधून पोलिसांनी रक्कम गोठवली. यातून तब्बल १ कोटी १ लाख ५८ हजार ७२७ रुपये पोलिसांनी वाचवले.दरम्यान, चालू वर्षात १९३० या हेल्पलाईनच्या माध्यमातून आतापर्यंत ११४ कोटींची रक्कम वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.