मुंबईः कूट चलनात गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम देण्याचे आमीष दाखवून माटुंगा परिसरातील महिलेची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पश्चिम बंगालमधील संवेदनशील परिसरातून अटक करण्यात आली. आरोपीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तक्रारदार महिला माटुंगा परिसरात वास्तव्याला आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर कूट चलनातील गुंतवणुकीबाबत संदेश आला होता. त्यांनी कूट चलनाच्या गुंतवणुकीत इच्छा व्यक्त केली होती. आरोपीने त्यांना गुंतवणुकीवर दुप्पट रक्कम देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे तक्रारदार महिलेने आपल्या मोबालवरून संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर क्यूआर कोड पाठवून महिलेच्या खात्यातून २३ हजार ९९६ रुपये काढले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार महिलेने याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हेही वाचा >>>> मुंबई : फेसबुकवर ओळख झालेल्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चित्रीकरण करून मुलीला पाठवले

पोलिसांनी तातडीने याप्रकरणी भादंवि कलमानुसार फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले इन्स्टाग्राम खाते व क्यूआरकोड पश्चिम बंगाल येथील परगनाज येथून हाताळण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलीस निरीक्षक केशव वाघ इतर पोलिसांसह तेथे रवाना झाले. वाघ यांनी तेथे आपली पथके तयार करून आरोपींचे वास्तव्य असलेल्या साऊथ २४ परगनाज जिल्ह्यातील मेटीयाबुर्ज व महेशटाला या संवेदनशील परिसरात अत्यंत गोपनीय पद्धतीने पाहणी केली. आरोपीची खात्रीशीर माहिती काढून पाळत ठेवण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठ्या शिताफीने छापा टाकून आरोपीला अटक करण्यात आली.

हेही वाचा >>>> गोठे, तबेल्यांमधील मलमूत्राचा खत म्हणून उद्यानांसाठी वापर करावा, नदी प्रदुषण रोखण्यासाठी भाजपची मागणी

या कारवाईत फसवणुकीच्या उद्देशाने इंस्टाग्रामवरून खाते सुरू करणारा व पीडीतेशी मोबाइलवर बोलणारा मुख्य सूत्रधार आरोपी सैदुल अली मौला (२४) याला जेरबंद करण्यात आले. आरोपीला पश्चिम बंगालचे अलिपुर सदर न्यायालयासमोर हजर करून ट्राझीट रिमांडवर माटुंगा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यात फसवणुकीतील संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी आरोपी २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे.

पथकातील पोलिसांचा सन्मान

ही कारवाई सुरू असताना कोलकातापासून १८० किमी दूर बिरभूम जिल्ह्यातील मुराराई परिसरातून चोरीच्या गुन्ह्यांतील महागडा आयफोन परत मिळवण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. पोलीस पथकाच्या या कामगिरीबद्दल उपायुक्त (परिमंडळ-४) डॉ. प्रवीण मुंढे यांनी माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केशव वाघ यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब कांगणे, पोलीस शिपाई संभाजी बार्शी व महिला पोलीस शिपाई नम्रता पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.