गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाल्याचं दिसत आहे. कोकण किनारपट्टीला हे चक्रीवादळ प्रत्यक्ष धडकलं नसलं, तरी किनारी भागात वेगवान वारे वाहात असल्याचं दिसून आलं. बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातल मान्सूनचं आगमनही जवळपास आठवड्याभरानं लांबलं. या पार्श्वभूमीवर आता मुंबई विमानतळावर प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. याचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. काही विमान कंपन्यांनी यासाठी प्रवाशांकडे दिलगिरीही व्यक्त केली आहे.

Cyclone Biparjoy चा फटका!

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबईतील वातावरणही बदललं आहे. वेगाने वारे वाहत आहेत. परिणामी मुंबई विमानतळावरच्या काही धावपट्ट्या सकाळच्या सुमारास उड्डाणासाठी बंद करण्यात आल्या. त्यामुळे अनेक विमान उड्डाणे उशीराने होत असल्याचं स्पष्ट झालं. यामुळे नियोजित ठिकाणी जाण्यासाठी विमानतळावर आलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागवा. काही नेटिझन्सही या गोंधळाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली.

Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Navi Mumbai city is called the Flamingo City This year arrival of flamingo bired delayed
फ्लेमिंगोंच्या आगमनाची प्रतीक्षाच

विमानतळावर प्रवाशांकडून तक्रारी सुरू झाल्यानंतर एअर इंडियानं यासंदर्भात निवेदन जारी केलं. “हवामानातील बदल आणि विमानतळावरील ९/२७ धावपट्टी बंद तात्पुरता बंद करण्यात आला. शिवाय, आमच्या नियंत्रणात नसलेल्या इतर काही घटकांमुळे काही विमानांची उड्डाणे उशीराने होत असून काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तसेच, लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”, असं एअर इंडियानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

इंडिगो कंपनीनंही एका प्रवाशाच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना “आमच्यासाठीही विमान उड्डाणं उशीरानं होणं तापदायक ठरलं आहे. आमच्या नियंत्रणात नसणाऱ्या गोष्टींमुळेच आम्हाला वेळापत्रकात बदल करावे लागत आहेत”, असं निवेदन दिलं आहे.

या सर्व गोंधळाचे व्हिडीओ काही नेटिझन्सकडून सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळाची सद्यस्थिती

बिपरजॉय चक्रीवादळ आधी पाकिस्तानच्या दिशेने जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता हे चक्रीवादळ वाट बदलून गुजरातच्या किनाऱ्याच्या दिशेने वळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पातळीवर तातडीच्या बैठकांचं सत्र सुरू झालं असून सर्व आवश्यक यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

Story img Loader