मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील दोन दिवसांत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या आठवडाअखेरीस मुंबई, ठाण्यासह कोकणात पाऊस कोसळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे वादळ गुजरातच्या दिशेने सारकण्याचा अंदाज काही खासगी संस्थांनी वर्तवला आहे. चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागाचे  तापमान २७ अंश सेल्सिअस असावे लागते. सध्या अरबी समुद्राचे तापमान ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास असून ते चक्रीवादळास अनुकूल आहे.

मोसमी वाऱ्यांचा संथ प्रवास..

दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, अंदमान आणि निकोबार बेटापर्यंत पोहोचलेल्या मोसमी वाऱ्यांची वाटचाल संथ सुरू आहे. मोसमी वारे पुढे सरकण्यास पोषक स्थिती नसल्यामुळे दोन दिवस आहे तीच स्थिती राहण्याची शक्यता  आहे. 

हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी वेगवेगळी ‘मॉडेल्स’ वापरल्यामुळे वादळाची तारीख आणि क्षेत्र याबद्दल वेगवेगळी माहिती मिळते. त्यामुळे वादळ नेमके कोणत्या तारखेला येणार याविषयी निश्चित काही सांगता येणार नाही. – सुषमा नायर, हवामान विभाग

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyclone possibility due to low pressure area form in arabian sea confirms imd mumbai print news zws