भिवंडीत राजनोली नाका येथील चहाच्या टपरीवर मंगळवारी झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटातील जखमीपैकी दोघांचा बुधवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात टपरीशेजारच्या गोदामाचा मालक इलियास खान याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्लॅस्टिकच्या भंगाराच्या गोदामात विविध कंपन्यांचे मुदत संपलेले बॉडी स्प्रे तसेच रूम फ्रेशनर्स होते. गोदामातील कर्मचारी हे स्प्रे हवेत फवारत असताना बाजूलाच असलेल्या चहाच्या टपरीतील गॅस सिलेंडरने पेट घेतला आणि काही क्षणातच त्याचा स्फोट झाला. या स्फोटात १३ जण जखमी झाले. त्यापैकी ठाण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेले जलाल चौधरी व मुंबईत सायन रुग्णालयातील अब्दुल खान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  
वकिलांमध्ये हाणामारी
भिवंडी न्यायालयाच्या आवारात हाणामारी करणाऱ्या वकिलांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री असताना बहुजन समाजवादी पार्टीने  त्यांच्या वाढदिवसानिमित्त चावे गावात लावलेला बॅनर फाडण्याच्या गुन्ह्य़ातील आरोपीचे वकीलपत्र अ‍ॅड. संदीप जाधव यांनी घेतले होते. अ‍ॅड. किरण चन्न्ो यांनी त्याबद्दल जाधव यांना जाब विचारला. त्यावेळी दोघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.

Story img Loader