विरार येथील श्रीया हॉटेलजवळ असलेल्या महावीर स्टीलच्या गोदामात मंगळवारी रात्री झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला असून, ३५ जण जखमी झाले आहेत. मंजुनाथ, गोविंद आणि मंजू अशी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे असून चौथ्या मृतदेहाची ओळख रात्री उशीरापर्यंत पटली नव्हती. या स्फोटामुळे गोदामाला लागून असलेली श्रीया हॉटेलची भींत कोसळली असून त्यामध्ये हॉटेलचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोट झालेले गोदाम दिलीप जैन यांच्या मालकीचे असून, तेथे मोठय़ा सिलिंडरमधील गॅसचा भरणा छोटय़ा सिलिंडरमध्ये करताना हा स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.     

Story img Loader