‘दादर पूर्व’चे नामांतर करण्याची मागणी

पश्चिम रेल्वेवरील ‘राम मंदिर’ रेल्वे स्थानकाच्या नामांतरानंतर आता मोनो रेल्वेवरील एका स्थानकाचे नाव ‘विठ्ठल मंदिर’ अथवा ‘प्रतिपंढरपूर’ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वडाळा पश्चिमेकडील काम पूर्णत्वास आलेल्या मोनोच्या स्थानकावर ‘दादर पूर्व’ अशी पाटी एमएमआरडीएकडून लावण्यात आली आहे. परंतु वडाळा नागरिक दक्षता समिती आणि स्थानिक शिवसेना-काँग्रेस नेते मंडळी यांनी एकत्र येत ‘दादर पूर्व’ स्थानकाला विठ्ठल मंदिर असे नाव देण्याची मागणी केली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

‘एमएमआरडीए’च्या मोनो रेल्वे प्रकल्पाचा चेंबूर ते वडाळा डेपो असा ८.९३ किलोमीटरचा पहिला टप्पा सुरू होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. याच मार्गिकेवरील ‘वडाळा डेपो ते संत गाडगेमहाराज चौक’ अशा ११ किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण एप्रिल, २०१७ रोजी होईल, असे मोनो प्रशासनातर्फे सांगण्यात आले. पण ही दुसरी माíगका सुरू होण्याआधीच त्यावरील ‘दादर पूर्व’ स्थानकाच्या नावावरून पालिका निवडणुकीच्या काळात प्रचंड गदारोळ होण्याच्या शक्यता आहे. मोनोच्या दुसऱ्या टप्यातील माíगकेवर वडाळा पश्चिम भागातील मोनो स्थानकास प्रशासनाने ‘दादर पूर्व’ असे नाव दिले आहे. स्थानकाच्या नावाच्या पाटय़ाही प्रशासनाकडून येथे लावण्यात आल्या आहेत. स्थानकाचे ९५ टक्के काम पूर्णत्वास आले असून या मार्गावर सध्या मोनोच्या प्राथमिक चाचण्या सुरू आहेत. मात्र मोनो सुरू होण्यापूर्वीच वडाळा पश्चिम विभागातील कात्रक मार्गावर असणाऱ्या या स्थानकाच्या ‘दादर पूर्व’ या नावावर येथील स्थानिक रहिवाशांचा समावेश असलेल्या ‘वडाळा नागरिक दक्षता समिती’ने आणि शिवसेना-काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

सह्य़ांचे निवेदन

दादर (पूर्व) स्थानकापासून २०० ते ४०० मीटर अंतरावर ४०० वर्षे जुने विठ्ठलाचे मंदिर असून ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्यामुळे या स्थानकास ‘विठ्ठल मंदिर’ अथवा ‘प्रतिपंढरपूर’ असे नाव देण्याबाबत स्थानिक नागरिकही आग्रही आहेत. याबाबत ‘वडाळा नागरिक दक्षता समिती’ने अडीच हजार स्थानिकांच्या सह्य़ांचे निवेदन मुख्यमंत्री तसेच एमएमआरडीए प्रशासनाला पाठवले असल्याची माहिती समितीचे खजिनदार दीपक िशदे यांनी दिली. त्याचप्रमाणे वडाळा विधानसभेच्या महिला उपविभाग संघटक माधुरी विश्वासराव-मांजरेकर यांनी नामांतरसंदर्भात दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली आहे. राजेंद्र पवार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मागणी केली.

Story img Loader