मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून दादर – काजीपेट उत्सव विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०७१९६/०७१९५ दादर – काजीपेट साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २८ नोव्हेंबर – ३० जानेवारीदरम्यान दर गुरुवारी चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०७१९५ काजीपेट – दादर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २७ नोव्हेंबर – २९ जानेवारीदरम्यान दर बुधवारी चालवण्यात येणार आहे. या दोन्ही रेल्वेगाड्यांच्या प्रत्येकी ९ फेऱ्या धावतील. या रेल्वेगाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आरमुर, मेटपल्ली, कोराटला आणि लिगंमपेट जगित्याल या स्थानकांवर थांबेल.

हेही वाचा : मुंबई: सर्कससाठी मैदान देण्यास चेंबूरमधील नागरिकांचा विरोध

गाडी क्रमांक ०७१९८ दादर-काजीपेट साप्ताहिक विशेष पिंपळखुटी, बल्लारशाह मार्गे धावेल. ही रेल्वेगाडी १ डिसेंबर – २६ जानेवारीदरम्यान दर रविवारी चालवण्यात येणार आहे. तर, गाडी क्रमांक ०७१९७ काजीपेट – दादर साप्ताहिक विशेष दर शनिवारी ३० नोव्हेंबर – २५ जानेवारीदरम्यान चालवण्यात येणार आहे. या दोन्ही रेल्वेगाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हूजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुंड, किनवट, आदिलाबाद, पिंपळखुटी, लिंगटी, कायर, वणी, भांदक, चंद्रपूर, बल्लारशाह, सिरपुर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचिरयाल, पेड्डापल्ली आणि जमिकुंटा येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीचे आरक्षण २२ ऑक्टोबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल.