मुंबई : ‘भोंगा, हलाल आणि अनधिकृत मजारला जो कसलीही भीती न बाळगता विरोध करणार, आम्ही त्यांना मत देणार’, अशा आशयाची पोस्ट भाजपच्या माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी फेसबुक या समाजमाध्यमावर केल्यामुळे दादर – माहीम विधानसभेत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. अशी विधाने करून भाजपने महायुतीतील शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांची कोंडी करून अप्रत्यक्षपणे मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला का ? अशी शंका व्यक्त करत समाजमाध्यमांसह मतदारसंघात या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. दादर – माहिम विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये, अशी भूमिका भाजपने सुरुवातीपासूनच घेतली होती. यावरून शिंदे गट व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खटकेही उडाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदा सरवणकर राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानी भेटण्यास गेले होते. पण राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने सरवणकर यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सदा सरवणकर यांच्या प्रचारात भाजपच्या कार्यकर्त्यांची तुरळक उपस्थिती पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपच्याच माहीम विधानसभा अध्यक्षांची पोस्ट ही चर्चेचा विषय ठरली आहे. राज ठाकरे यांनी सातत्याने मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे, तसेच त्यांनी शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणात माहीमच्या समुद्रात अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या मजारचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने ते बांधकाम हटवले; त्यामुळे भोंगा व अनधिकृत मजारचा मुद्दा भाजपच्या तेंडुलकर यांच्या पोस्टमध्ये असल्यामुळे भाजपने अप्रत्यक्षपणे मनसेच्या अमित ठाकरे यांना मतदान करण्याचे आवाहन केले का ? अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

yavatmal ashok uike loksatta news
यवतमाळ : शिस्तप्रिय भाजपमध्ये धुसफूस…मंत्र्याच्या सत्कार समारंभातच…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तेव्हा आई देवाचा जप करत बसली होती”, अजित पवारांनी सांगितला विधानसभेच्या निकालाच्या दिवशीचा किस्सा
jayant patil Sarcastic speech to rular party on last day of Winter session of the legislature
एक मुख्यमंत्रीही काफी है! इतरांची गरज नाही, जयंत पाटलांची टोलेबाजी
ajit pawar visit massajog
शरद पवारांपाठोपाठ आता अजित पवारही मस्साजोगला भेट देणार
Congress protest against BJP , Congress Mumbai office attack , Congress Nagpur protest ,
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
BJP MLA suresh dhas, pankaja munde,
भाजप आमदार स्पष्टच बोलले, म्हणाले पंकजा मुंडेंनी भाजपचे काम केले नाही
Pramod Gharde Rebel Candidate, Pramod Gharde Welcome banner,
भाजप बंडखोराने लावले फडणवीसांचे स्वागत फलक, बावनकुळेंचेही छायाचित्र

हेही वाचा : मुंबई: मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक

‘माझ्यासाठी राष्ट्र प्रथम असून दादर – माहीम विधानसभेत कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार निवडून यावा, अशी माझी इच्छा आहे. राज ठाकरे यांनी भाजपला विरोध केला नसून पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होईल, असे विधानही त्यांनी केले होते. कोणतीही सत्ता नसताना ते रोखठोकपणे बोलत असतात. त्यामुळे दादर – माहीम विधानसभेतील मतदारांमध्ये राज ठाकरेंबद्दल एक विश्वास व प्रेम आहे. एकनाथ शिंदे सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलत असतात. योगी आदित्यनाथही सातत्याने आवाज उठवत असतात. मी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये कोणत्याही पक्षाचा किंवा उमेदवाराचा उल्लेख केलेला नाही. जनता विचारपूर्वक पद्धतीने मतदान करेल’, असे अक्षता तेंडुलकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

Story img Loader