झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशीही करण्यात आली. मात्र, दादर पोलिसांना पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. त्यांना मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी दादर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – “जनाची नाही तर मनाची ठेवा”, एअरबस प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाल्या “गेली सात वर्ष सत्तेत …”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

झोपु प्रकल्पात स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून ९ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात जून महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून आरोपींनी चौकशीत पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे आरोपींच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. 

हेही वाचा – “जनाची नाही तर मनाची ठेवा”, एअरबस प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाल्या “गेली सात वर्ष सत्तेत …”

किरीट सोमय्यांचे पेडणेकरांवर आरोप

”किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता एसआरे मध्ये सहा गाळे, सदनिका हस्तगत केल्या असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सदनिकांचा ताबा घ्यावा”, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली होती.

दरम्यान, आज त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्रानाही पत्रही लिहिले आहे. ”गोमाता जनता एसआरए वरळी येथे सदनिका बळकावण्यासाठी किशोरी पेडणेकर यांनी बनावटगिरी आणि फसवणूक केली असून त्यांच्या कुटुंबातील कदम यांनी मूळ लाभार्थी अंधारी यांच्या नावाने स्वाक्षरी करत खोटी कागदपत्रे सादर केली”, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

Story img Loader