मुंबई : वरळी कोळीवाड्याजवळील नरिमन भाट नगर येथे ग्राईंडरमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी दादर पोलिसांनी मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल केला. मृत कामगाराला ग्राईंडर चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना त्यातून कच्चा माल काढण्यास सांगितले. त्यावेळी शर्ट अडकल्यामुळे तो ग्राईंडरमध्ये खेचला गेला. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मृत कामगाराचा चुलत भाऊ महेश यादव याच्या तक्रारीवरून याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, महेश यादव गेल्या पाच वर्षांपासून सचिन कोठेकर यांच्याकडे चायनीज खाद्यपदार्थांसाठी लागणारा कच्चा माल बनवण्याचे काम करीत होता. त्याच्यासोबत पाच जण तेथे काम करीत होते. चायनीज पकोडे बनवण्यासाठी पीठ मळणे, कोबी, फ्लॉवर बारीक करणे यासाठी नरिमन भाटनगर येथील अमर संदेश मंडळाजवळील एका खोलीमध्ये इलेक्ट्रीक ग्राईंडर ठेवला होता. गेल्या पाच वर्षांपासून यादवच ग्राईंडरवर काम करीत होता. आरोपी सचिन कोठेकरने शनिवारी कच्चा माल आणण्यासाठी सूरज यादवला पाठवले. बराच वेळ झाला तरी सूरज यादव परत आला नाही.

mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
attack on police Nagpur, Nagpur, police Panchnama Nagpur,
हे काय चाललेय नागपुरात? पंचनामा करायला गेलेल्या पोलिसावरच हल्ला….
in Pavana Dam in Maval taluka on Wednesday evening when two persons drowned after their boat overturned in water
पवनानगर बोट दुर्घटना, तरुणांच्या मृत्यूप्रकरणी बंगला मालक , बोट मालकांवर गुन्हा दाखल
Ambivli railway station , Irani area mob,
आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी वस्तीमधील जमावाची अंधेरी पोलिसांवर दगडफेक
Case filed for filming police officers dismissed after two years
पोलिसांचे चित्रीकरण केल्याप्रकरणी दाखल गुन्हा दोन वर्षांनी रद्द, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Former director granted bail in Ghatkopar billboard accident case
घाटकोपर फलक दुर्घटनाप्रकरणी माजी संचालिकेला जामीन
youth killed on suspicion of stealing petrol
पुणे : पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

हेही वाचा…मुंबईच्या हवा प्रदूषणात पुन्हा वाढ, नेव्ही नगर कुलाबा येथील हवा ‘अतिवाईट’

चायनीज पकोड्याच्या गाडीवर कार्यरत असलेल्या सचिनला अखेर दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सूरज ग्राईंडरमध्ये अडकल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वनी घटनास्थळी धाव घेतली. सूरज ग्राईंडरमध्ये अडकला होता. त्याला ग्राईंडरमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तो बाहेर निघाला नाही. अखेर अग्निशमनदलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सूरजला ग्राईंडरमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून परळ येथील केईएम रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सूरजला ग्राईंडर चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना त्याला त्यातून कच्चा माल काढण्यास सांगितले. त्यामुळे सूरजचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी मालक सचिन कोठेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दादर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader