वर्गात मस्ती करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना साखळीने बांधून शाळेत अर्धनग्नावस्थेत फिरवून नंतर त्यांच्याकडून शाळेतील स्वच्छतागृह साफ करून घेणाऱ्या सिंड्रेला परेरा या शिक्षिकेला सोमवारी अखेर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला जामिनावर मुक्त केले. या शिक्षिकेस शाळेने निलंबित केले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे अँटोनिया डिसिल्वा हायस्कूलच्या वतीने सांगण्यात आले. १३ मार्च रोजी वर्गात मस्ती केली म्हणून संतप्त झालेल्या या शिक्षिकेने राही गांधी या विद्यार्थ्यांसह त्याच्या आणखी दोन मित्रांना साखळीने बांधून ठेवले. त्यांचे शर्ट काढून त्यांना संपूर्ण शाळेमध्ये फिरवले आणि नंतर त्यांच्याकडून शाळेतील स्वच्छतागृह साफ करून घेतले होते.

Story img Loader