Dahi Handi 2022 Celebration : राज्यभरात काल दहीहंडी उत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा झाला. करोना कालखंडानंतरचा हा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने गोविंदा पथक सहभागी झाले होते. मुंबईत काल (शुक्रवार) पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात संपूर्ण दिवसभरात १५३ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी १३० जणांना उपचार करून सोडून देण्यात आले तर उर्वरित २३ जण रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Dahi Handi 2022 : तीन थर उभारून त्यावर शिवराय-अफजल भेटीचे दृश्य; मालाडच्या गोविंदा पथकाची दादरला कामगिरी

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले

विविध शासकीय आणि पालिका रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार नायर रुग्णालयात १२, जे जे रुग्णालयात ३, सेंट जॉर्जेस मध्ये ५, जीटी रुग्णालयात १३, केईएम रुग्णालयात ४०, सायन रुग्णालयात १०, जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात ६, कांदिवली येथील डॉ आंबेडकर रुग्णालयात ३ जण दाखल झाले होते. कूपर रुग्णालयात १४, व्ही एन देसाई रुग्णालयात ८, राजावाडी रुग्णालयात १७, अगरवाल रुग्णालयात १,बांद्रा भाभामध्ये ५, वरळीच्या पोद्दार रुग्णालयात ८ जण दाखल झाले होते. तर मुंबई रुग्णालय, एस के पाटील रुग्णालय, नानावटी रुग्णालय, सावरकर रुग्णालयात प्रत्येकी एका गोविंदावर उपचार करण्यात आले. तर गोवंडी येथील शताब्दीमध्ये दोन जण दाखल झाले होते.

Dahi Handi 2022 : दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान!

या गोविंदांपैकी कोणाला खरचटले आहे, पाय दुखावला, मुका मार लागला, खांदा निखळला, स्नायू दुखावले अशा प्रकारच्या तक्रारी या गोविंदाच्या असून जायबंदी होण्याइतपत दुखापत कोणाला झाली नाही.