मुंबई :  मेट्रो २ (दहिसर – अंधेरी) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व – अंधेरी पूर्व) मार्गिकेच्या दहिसर – आरे अशा पहिल्या टप्प्यातील मेट्रोने २५ लाख प्रवासी टप्पा पार केला आहे. अवघ्या तीन महिन्यातच हा टप्पा पार करण्यात आला आहे. मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेतील दहिसर – आरे असा एकूण २० किमी लांबीचा टप्पा २ एप्रिलला, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला आहे. या टप्प्यावरील व्यवसायिक वाहतुकीस ३ एप्रिलपासून सुरुवात झाली. पहिल्या महिन्यात, २ एप्रिल ते १ मे दरम्यान आठ लाख ८३ हजार ३५४ प्रवाशांनी प्रवास केला होता. याद्वारे महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडला (एमएमएमओसीएल) एक कोटी  ७५ हजार रुपये महसूल मिळाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता हा मार्ग सेवेत दाखल होऊन तीन महिने पूर्ण झाले आहेत. या तीन महिन्यांत प्रवासीसंख्य २५ लाखांवर गेल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडए) ट्विटरवरून दिली. या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. दिवसाला तीन ते साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतील असा दावा हा मार्ग सेवेत दाखल करताना एमएमआरडीएने केला होता. मात्र प्रत्यक्षात दिवसाला २५ ते ३० हजार प्रवासीच या मार्गावर प्रवास करीत आहेत. अशा वेळी दहिसर – डी. एन. नगर आणि दाहिसर – अंधेरी असा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यास प्रतिसाद वाढेल, असा दावा  एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahisar aarey metro passenger number crosses migrants transportation service mumbai print news ysh