मुंबई : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलाचा अपप्रचार केल्यामुळे राज्यातील दलित मतदार महाविकास आघाडीच्या मागे उभा राहिला, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत दलित समाज महायुतीला पाठिंबा देईल, असा विश्वास ‘रिपाइं’चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. राज्यातील आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाइं’ला एक मंत्रीपद द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. चव्हाण सेंटर येथे शनिवारी ‘रिपाइं’ राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी आठवले यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागण्याच्या सूचना केल्या.
‘विधानसभा निवडणुकीत दलित समाजाचा महायुतीलाच पाठिंबा’
राज्यातील आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाइं’ला एक मंत्रीपद द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 01-07-2024 at 02:13 IST | © The Indian Express (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalit community will support mahayuti in assembly elections says rpi chief ramdas athawale zws