मुंबई : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलाचा अपप्रचार केल्यामुळे राज्यातील दलित मतदार महाविकास आघाडीच्या मागे उभा राहिला, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत दलित समाज महायुतीला पाठिंबा देईल, असा विश्वास ‘रिपाइं’चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. राज्यातील आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाइं’ला एक मंत्रीपद द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. चव्हाण सेंटर येथे शनिवारी ‘रिपाइं’ राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी आठवले यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागण्याच्या सूचना केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा