नाशिकमधील धरण सुरक्षा संघटनेने मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर धरणाची दुरुस्ती करण्याबाबतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेला सादर केला असून या अहवालाची दखल घेऊन महानगरपालिकेने मोडक सागर धरणाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालात करण्यात आलेल्या शिफारसींनुसार धरणाची भिंत, पोलादी कठड्यांची रंगरंगोटी, दगडी भिंत आणि धरणाकडे जाणारे रस्त्याची दुरुस्ती आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी तीन कोटी ७१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> मुंबई : समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल; हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी मोडक सागर एक महत्त्वाचे धरण आहे. या धरणातून दरदिवशी १,५५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. उर्ध्व व मध्य वैतरणा धरणांतून सोडण्यात येणारे पाणी मोडकसागर धरणात साठवण्यात येते. या धरणाची वेळोवेळी देखभाल करण्याची गरज आहे. तसेच नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेतर्फे पावसाळापूर्व व पावसाळानंतर धरणाची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती व देखभालीबाबतचा सविस्तर अहवाल मुंबई महानगरपालिकेला सादर करण्यात येतो. या अहवालात धरणाच्या दुरुस्तीची शिफारस करण्यात आली आहे. रस्ता खराब झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक ठिकाणी जाता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी महानगरपालिका ३.७१ कोटी रुपये खर्च करणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : भल्या पहाटे स्वच्छतेसाठी चौकीवर हजर राहणाऱ्या महिला सफाई कामगारांना दिलासा

अहवालात काय म्हटले आहे

सुमारे १० वर्षांपूर्वी धरणाची भिंत आणि अंतर्गामी विहिरीला रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यामुळे धरणाच्या बाह्यभागाच्या भिंतीवर शेवाळ, बुरशी, लहान झुडपे, गवत उगवले आहे. धरणाचा पृष्ठभाग मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी रंग गळून पडला आहे व भिंती आणि विहीर यांची हानी होते आहे. पूरनियंत्रणाद्वारे, थोपद्वारे, मृदू पोलादी कठडे व पादचारीपूल मृदू पोलादी आहेत. धरणाच्या दमट वातावरणामुळे या मृदू पोलादाचे पृष्ठभाग गंजून खराब झाले आहेत. त्यामुळे त्यांचेही रंगकाम करावे लागणार आहे. धरणालगत व धरणाच्या खालच्या बाजूला असलेले दगडी पिचिंग वाहून गेल्यामुळे खालील दगडी भिंतीची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

या धरणाची लांबी ५७० मीटर असून उंची ८२ मीटर आहे. या धरणाला १२.१९ मीटर आणि  ७.९२ मीटर लांबी – रुंदीच्या आकाराचे स्वयंचलित पूर नियंत्रण दरवाजे आहेत. त्यातून प्रतिसेकंद दोन लाख घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो.