मुंबई : दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पायऱ्या बसवताना कामाचा दर्जा राखला जात नसल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या तलावाच्या पायऱ्या बसवण्यासाठी विटांच्या चुऱ्याचा वापर करण्यात येत असल्याची एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत आहे. तलावाच्या पायऱ्यांचे नुकसान केल्यामुळे आधीच्या कंत्राटदाराला निलंबित केले असताना पुन्हा तीच गत असल्याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दुरवस्था झाली होती. तसेच तलाव परिसरातील पायऱ्यांवरील बांधकामे झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र आधीच्या कंत्राटदाराने तलावातील गाळ काढताना पायऱ्यांचे नुकसान केले होते. त्यामुळे कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याचे कंत्राटही रद्द करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने नव्याने निविदा काढण्याचे ठरवले होते. तेव्हापासून बाणगंगा तलावाचे काम ठप्प झाले होते. मात्र या तलावाच्या पायऱ्यांचे काम सुरू असतानाची एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

हेही वाचा >>>प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर

विटांच्या चुऱ्याचा वापर

सामाजिक कार्यकर्ते झोरू भतेना यांनी ही ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर टाकली आहे. त्यात बाणगंगा तलावाच्या पुरातन पायऱ्या बसविताना विटांच्या चुऱ्याचा वापर करताना एक कामगार दिसत आहे. याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे. बाणगंगा ही पुरातन वास्तू असून त्याच्या कामासाठी कोणी सल्लागार नेमला आहे की नाही, त्याची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल पुरातन वास्तुतज्ज्ञ भरत गोठोसकर यांनी केला आहे.

हेही वाचा >>>पूल, इमारती म्हणजे विकास नव्हे! सुप्रिया सुळे यांनी पक्षातील फुटिरांना फटकारले

महापालिका आयुक्तांच्या सूचनांचे पालन का नाही?

बाणगंगा परिसर आणि या ठिकाणची मंदिरे यांच्याशी संबंधित कामांमध्ये योग्य आदर ठेवला जाणे अपेक्षित आहे. पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधून बाणगंगा परिसरातील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्याचे पालन होते का, असा सवाल स्थानिक विचारत आहेत. याप्रकरणी पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.