लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’चे काम सुरू असून आसपासच्या अनेक निवासी-अनिवासी इमारती, बांधकामांना या कामाचा फटका बसत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पण आता राज्याचा कारभार चालविण्यात येत असलेल्या मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीलाच या कामाचा बसला आहे.

आणखी वाचा-प्रशिक्षणाच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कराटे शिक्षकाला अटक

मंत्रालय परिसरात भुयारी मेट्रो मार्गिकेसाठी खोदकाम सुरू असून या कामाअंतर्गत नियंत्रित स्फोटाद्वारे (कंट्रोल ब्लास्टींग) खडक फोडण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी या कामादरम्यान मंत्रालयाच्या काही खिडक्यांच्या तावदानांचे नुकसान झाले. मंत्रालयाच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचाही फुटल्या. यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) तात्काळ नियंत्रित स्फोटाचे काम थांबविले आहे. तर आता लवकरच एमएमआरसीकडून मंत्रालयाच्या इमारतीच्या नुकसानाचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरसीच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली आहे.