मुंबई : मुंबईच्या सांस्कृतिक आणि रंगभूमीवरील इतिहासाची गौरवशाली परंपरा अनुभवत शतकी वाटचाल पूर्ण केलेल्या दामोदर नाटय़गृहावर पडदा पडणार आहे. कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने उभ्या राहिलेल्या या नाटय़गृहाची जीर्ण इमारत पाडून नाटय़गृहाची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. या कामाला १ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार असून, साडेतीन-चार वर्षांत आधुनिक शैली आणि सोयीसुविधांनी युक्त नवे नाटय़गृह नाटय़रसिकांच्या सेवेत येईल.

कामगार रंगभूमीवरील कलाकार, मुंबईतील विविध समाजसंस्थांचे कार्यक्रम, नाटकांच्या तालमी अशा विविध कामांसाठी नाटय़प्रेमींचे हक्काचे व्यासपीठ ही परेलच्या दामोदर नाटय़गृहाची गेल्या कैक वर्षांची ओळख. १९११ मध्ये ‘द सोशल सव्‍‌र्हिस लीग’ या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. विविधांगी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेने मुंबईच्या कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून १९२२ मध्ये दामोदर नाटय़गृहाची उभारणी केली. दरवर्षी या भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे दामोदर नाटय़गृहाची इमारत, तेथील खुच्र्या आणि शाळेची इमारत यांचे नुकसान होते. करोनानंतर ४ ते ५ वेळा आम्ही नाटय़गृहाची डागडुजी केली. सातत्याने डागडुजी करणे शक्य नाही. शाळेत साडेतीन हजार विद्यार्थी सध्या शिकत असल्याने शाळेची इमारतही पाडता येणार नाही. त्यामुळे नाटय़गृह पाडणे हाच पर्याय असल्याचे ‘द सोशल सव्‍‌र्हिस लीग’चे अध्यक्ष आनंद माईणकर यांनी सांगितले.

Lakhat EK Aamcha Dada
‘सर्वोत्कृष्ट कुटुंब’ स्पर्धेत डॅडी आणि सूर्या समोरासमोर येणार, ‘लाखात एक आमचा दादा’मधील डॅडी म्हणाले, “निंबाळकर घराण्याच्या इज्जतीचा…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
Patrachawl, Patrachawl yojana, mhada , mumbai,
मुंबई : सतरा वर्षांची प्रतीक्षा संपणार, पत्राचाळीतील मूळ भाडेकरूही लवकरच हक्काच्या घरात
congress Rahul Gandhi
चांदणी चौकातून : जय बापू, जय भीम, जय संविधान
Mahakumbh Mela 2025
Mahakumbh Mela 2025 : संस्कृती अन् नद्यांची संगम भूमी असलेल्या ‘प्रयागराज’च्या नावाचा अर्थ माहीत आहे का?
lift at Dombivli East railway station has been closed for three days
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील उदवहन तीन दिवसांपासून बंद, उदवहनला वाहनांचा वेढा
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Story img Loader