सातवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सांताक्रूझ (पूर्व) येथील प्रभात कॉलनीत शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. दूरचित्रवाणीवरील एका प्रसिद्ध मालिकेतील नृत्याचा सराव करत असताना गळफास लागून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वाकोला पोलिसांनी व्यक्त केली.
प्रभात कॉलनीतील विनय पाल (१३) आई-वडील आणि बहिणीसह राहतो. सातवीत शिकणारा विनय शुक्रवारी आपल्या बेडरूममध्ये अभ्यास करत होता. आवाज देवूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आईने खिडकीतून पाहिले असता त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. तो नृत्य शिकण्यासाठी क्लासला सुद्धा जात होता. ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमात दाखविल्या जाणाऱ्या ‘एरियल डान्स’ या नृत्यप्रकाराच्या सरावादरम्यान गळफास लागून त्याचा मृत्यू झाल्याचे विनयच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. घरात आत्महत्येविषयीची चिठ्ठी सापडली नसल्याचे पोलिसांनी  सांगितले.

Story img Loader