मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ात अनधिकृत बांधकामे मोठय़ा प्रमाणावर होत असून मुंब््रयामध्ये तर ८०-९० टक्के इमारती अनधिकृत आहेत. ही सर्व बांधकामे पाडून टाकणे शक्य नाही, अशी हतबलता दाखवत मजबूत असलेल्या अनधिकृत इमारती नियमित करण्याचा विचार राज्य शासन करीत असून धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत केले.
अनधिकृत इमारती नियमित किंवा पुनर्वसन करण्यापेक्षा शासनाने त्या ताब्यात घेण्याची मागणी शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी केली.
शीळफाटा येथील अनधिकृत इमारत दुर्घटनेप्रकरणी विधानपरिषदेतही सविस्तर चर्चा झाली. अनधिकृत इमारती मोठय़ा प्रमाणावर बांधल्या जात असताना त्यांच्यावर कारवाई करणे कठीण बनले असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली.
मजबूत अनधिकृत इमारती नियमित केल्या, तरी धोकादायक इमारती पाडाव्याच लागतील. पण त्यातील रहिवाशांचे पुनर्वसन करताना संक्रमण शिबीरांची व्यवस्था कशी करणार, हा प्रश्न आहे. एमएमआरडीएची घरे त्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कायदा आहे पण..
अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करून ३ वर्षे तुरुंगवास व दंडाची तरतूद करणारा कायदा राज्य शासनाने केला. मात्र त्याची अंमलबजावणी कोणी करायची, हा प्रश्न असून स्वतंत्र नागरी पोलिस दल नसल्याने काहीच कारवाई होत नाही, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
गृहखात्याने पोलिस कर्मचारी देण्याची तयारी दाखविली असली, तरी त्यांच्यावरील खर्च तीन महिने आगाऊ मिळाला पाहिजे, अशी अट घातली आहे. मुंबई महापालिकेचीही त्यासाठी तयारी नाही. त्यामुळे यासंदर्भात महापालिकांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुर्घटनाग्रस्त..
कळवा रुग्णालय
मृत
सकिना सिद्दिकी (२०), सीमाबाई चव्हाण (२५), सीमा खान (२८), सावित्री गौड (६५), संजिदा अन्सार उलहक सिद्दिकी (५), तबस्सूम आरा मजहर हुसेन शेख (३५), साजिदा अन्सार अन्सारी (९), संतोष मुनीर यादव (४०), मकबुल सेलम सईद (२४), मेरजुन फैजुउद्दीन शेख (३६), नुरहुसेन अमजद शेख (२१),अन्साल शेख (४५), यासिर नसिबउद्दीन खान (४), मनशाह नसुउद्दीन खान (१०), ईशम अब्दुल लतिफ सिद्दिकी (अडीच वर्षे), महेमूद शेख (२१) दोन अनोळखी (५ आणि ७ वर्षे)
जखमी
हसीना बाबू अन्सारी (२७), गुडिया वर्मा (२७), मारिया शेख (२५), ताराबाई राठोड (३०), दहा महिन्यांची अनोळखी मुलगी, महम्मद अफरोज अब्दुल हक (२३), राजू जाधव (२५), अब्दुल वहाब सय्यद (४५), मिर्झा महम्मद बेग (४०), चंद्रभान यादव (३५), रामकेश प्रजापती (२८), शरिफाउद्दीन मंसुरी (३८), गंगाराम निसाद (३५), सिद्दिकी झुल्फीखार खान (१२), इम्रान सय्यद (२८), काळू चव्हाण (२१) शाहीद आदिशाह (४५), नथू रतलू राठोड (३७), जुलजार खान (१०), महम्मद अहिराज शेख

ठाणे जिल्हा रुग्णालय
मृत
नुर बंकर (१९), मुस्ताफा अब्दुल रझाक शेख (७०), असार जुबेर शेख (२१), साजिदा अन्सार अन्सारी (५), लाडली मुन्ना यादव (४), विक्रम भोरी जयस्वाल (२५), शीलादेवी मुन्ना यादव (२७), सोहल अन्सारी (१४), साहिया खातून (२३),  किरण ठाकूर (३०),  तीन पुरुष आणि चार महिलांची ओळख अद्याप पटलेली नाही.
जखमी
हसीना हजूर हुसेन शेख (१०), सर मोहम्मद शेख (३५), दिनेश राम (३२), राजा गांधीप्रसाद पांडे (३२), जयप्रकाश यादव (२५), दुखीलाल (३०), मोहोतम राम (५०), बालाजी (३०), अब्दुल हडी मोहम्मद इस्थाले (४ महिने), संध्या ठाकूर (४).

Story img Loader