मुंबई : आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी दर्शन सोळंकीच्या आत्महत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने अरमान खत्री (१९) या विद्यार्थ्यांला अटक केली आहे. सोळंकीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अरमानचे नाव असून त्याला मृत्यूस जबाबदार धरले होते. विशेष तपास पथकाला चिठ्ठीतील हस्ताक्षर सोळंकीचेच असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालातून स्पष्ट झास्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री अरमानला अटक केली. त्याला १३ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोळंकी व अरमान वसतिगृहात एकाच मजल्यावर राहत होते. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. सोळंकीच्या खोलीत सापडलेली चिठ्ठी त्यानेच लिहिल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या हस्ताक्षर विश्लेषण कक्षाने दिलेल्या अहवालात शुक्रवारी स्पष्ट झाले. विशेष तपास पथकाने अरमानची चौकशी केली होती. सोळंकीने धार्मिक टिप्पणी केल्याच्या रागातून अरमानने त्याला कटर दाखवून धमकाविल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सोळंकी घाबरला होता. त्याने खत्रीची माफीही मागितली होती, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.दरम्यान, अरमानने धमकावण्यासाठी वापरलेल्या कटरचा शोध घेणार असून काही व्यक्तींचे जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Darshan solanki suicide case in iit mumbai amy
Show comments