Uddhav Thackeray Dasara Melava 2024 Live Updates : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती. तीच परंपरा आता उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून आज स्वतंत्रपणे दसरा मेळावा आयोजित केला होता. महत्त्वाचे म्हणजे यंदाचा दसरा मेळावा विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने दोन्ही मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात आयोजित करण्यात आला होता.तर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार दादर येथील शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) तसेच पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या दोन्ही मेळाव्याचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याचे थेट प्रक्षेपण
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचं थेट प्रक्षेपण
Uddhav Thackeray And Eknath Shinde Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल!
एकनाथ शिंदे यांनी महापुरुषांचं राजकारण केलं. त्यांना राज्यातील एकही आंदोलन सांभाळता आलं नाही त्यांनी राज्यात दंगली घडवून आणल्या. त्यांनी महाराष्ट्र नासवण्याचं काम केलं. आज तेच आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. १० वर्षांपूर्वी इंदू मिलचं भूमिपूजन केलं. पण त्याची एकही वीट उभी केली नाही. शिवरायांचा स्मारकही अद्याप उभं राहिलं नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
जातीजातीत मतभेद करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत – सुषमा अंधारे
महाराष्ट्रात सर्व जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. पण त्यांच्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दरी निर्माण करण्याचे काम केलं. लोक विकासावर प्रश्न विचारतील म्हणून त्यांनी जातीजातीमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विकासावर प्रश्न विचारल्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
“सत्ताधारी आमदार आणि मंत्रीच महिलांबाबत अपशब्द उच्चारत असतील तर या महायुतीच्या सरकारकडून काय अपेक्षा करायच्या? हा महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांत अनेक महिला आणि मुली गायब झाल्या. पण तरीही या सत्ताधाऱ्यांना काहीही देणंघेणं नाही. किसान सन्मान निधीचे तुम्ही सहा हजार दिले म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या आहेत का? तीन महिन्यात ५१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली”, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन बानुगडे पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होतो. बाळासाहेबांनी ही परंपरा सुरु केली. तीच परंपरा उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक विचारांचे सोन लुटण्यासाठी दाखल होत आहेत, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली.
दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट, दादरमध्ये पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यासाठी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात गर्दी होऊ लागली आहे. मात्र दुपारपासूनच दादर व आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
आझाद मैदानावरील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहेत. मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाले आहेत. याठिकाणी सांस्कृती कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलं आहे.
संजय राऊत, विनायक राऊत, अंबादास दानवे, सुषमा अंधारेसह शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे ) नेते व्यासपीठावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे. शिवाजी पार्कवर पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात
शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी सुरु आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याच शिवाजी पार्क मैदानावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार शक्यता आहे. शिवाजी पार्कातील मैदानावर बॅरिकेटींग करण्यात आले आहेत. त्यासोबतच साधारण दीड ते दोन लाख शिवसैनिक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री मुंबईत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. शिवाजी पार्क मैदानातही सर्वत्र चिखल आहे. आज सकाळपासूनही सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर परतीच्या पावसाचे विघ्न येण्याची शक्यता आहे.
दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या शिवसैनिकांची वाहनं बेलार्ड पिअर, काला घोडा, मुंबई युनिव्हर्सिटी परिसर, चर्चगेट परिसर आणि सीएसएमटी स्थानकाच्या मागील बाजूस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिवसेना ( एकनाथ शिंदे) दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जय्यत तयारी
शिवसेना ( एकनाथ शिंदे) दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर वीस बाय साठ चा भव्य मुख्य स्टेज बनवण्यात आला आहे. स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. तसेच पंचवीस हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात आयोजित करण्यात आला होता. तर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार दादर येथील शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आला होता.