एका महिलेची अश्लील चित्रफित बनवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या टि जे पॅव्हेलियन ट्रस्टचा पदाधिकारी दत्ता कोठावळे याला २१ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मंदिराच्या आवारात स्टॉल लावून विक्री करणाऱ्या एका महिलेवर गेले पाच महिने बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.  कोठावळे याला गुरुवारी संध्याकाळी अटक करण्यात आली होती. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्याकडील मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.      

Story img Loader