मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील लष्कर-ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हीड कोलमन हेडली याची खटल्यातील सहआरोपी अबू जुंदाल याच्या वकिलांना उलटतपासणी करायची असून २२ ते २५ मार्च या कालावधीत ही उलटतपासणी घेण्यात येणार आहे.
सध्या अमेरिकेतील कारागृहात ३५ वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या हेडलीला २६/११च्या खटल्यात आरोपी बनवण्यात आल्यावर त्याने माफीचा साक्षीदार करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. तसेच हल्ल्याचा कट कसा, कुठे आणि कुणी शिजवला याची माहिती देण्यास सरकारी पक्षाला आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर ८ ते १३ जानेवारी या दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्याची सरतपासणी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा