मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील सूत्रधार आणि कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणी मागणे तसेच मारहाण केल्याचा आरोपाखाली मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. इक्बालसह त्याच्या एका साथीदारालाही पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सोमवारी भायखळा पोलीस ठाण्यात सलीम शेख या इस्टेट एजंटने इक्बाल कासकर विरोधात तक्रार दाखल केली होती. इक्बाल आणि त्याच्या सहकाऱयांनी तीन लाख रुपयांची खंडणी मागणी करत आपल्याला मारहाण केल्याचा आरोप सलीम शेख यांनी केला आहे. ही घटना दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया रस्त्यावरील डांबरवाला इमारतीतील एका खोलीत घडली होती. त्यामुळे भायखळा पोलिसांनी सलीम शेख यांची तक्रार जेजे मार्ग पोलीस ठाण्यात हस्तांतरित केली. जेजे मार्ग पोलिसांनी तक्रारीची दखल घेत कारवाई करत इक्बाल कासकरला अटक केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा