मुंबई : मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल.
मध्य रेल्वे
मुख्य मार्गिका
कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांत थांबतील. तर, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांत लोकल थांबणार नाही.
हार्बर मार्ग
कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी – गोरेगाव / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत कुर्ला – पनवेलदरम्यान २० मिनिटांच्या वारंवारतेने विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.