Shivaji Maharaj Statue  : मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकारांना तसेच नौदलाला तेथील सोसाट्याचा वारा आणि खाऱ्या हवेत लोखंड किती गंजते, याचे आकलन झाले नसावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले. पुतळा कोसळल्याची घटना दु:खदायक असून त्यामुळे वेदना झाल्या. पण त्यावरून जे राजकारण सुरू आहे, ते अधिक वेदनादायी आहे. या घटनेमुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करीत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा पुतळा राज्य सरकारने उभारलेला नव्हता. तो नौदलाने चांगल्या हेतूने हा पुतळा उभारला होता. आम्ही नौदलाच्या मदतीने याही पेक्षा मोठा पुतळा पुन्हा उभारु. यावरुन कोणीही राजकारण करु नये, तो खुजेपणा आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

मोदी जिथे हात लावतात, त्याची माती संजय राऊत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यांच्या हस्ते आयोध्यातील राम मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्या ठिकाणी पाणी गळती सुरू झाली आहे. संसदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. तेथेही पावसाळ्यात गळती सुरू झाली. ज्या पुलांचे त्यांनी उद्घाटन केले ते पूल उद्ध्वस्त झाले. अटल सेतूला तडे गेले. ज्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले तो पुतळा अखेर पडला. मोदी ज्या ठिकाणी हात लावतात. त्याची माती होते, अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.

dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
maharashtra assembly election 2024, raosaheb danve,
रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

गुन्हे दाखल करावेत नाना पटोले

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून ही महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त कंत्राटदार आणि अधिकारी नाही, तर राज्य व केंद्र सरकारवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे केली.