Shivaji Maharaj Statue : मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकारांना तसेच नौदलाला तेथील सोसाट्याचा वारा आणि खाऱ्या हवेत लोखंड किती गंजते, याचे आकलन झाले नसावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले. पुतळा कोसळल्याची घटना दु:खदायक असून त्यामुळे वेदना झाल्या. पण त्यावरून जे राजकारण सुरू आहे, ते अधिक वेदनादायी आहे. या घटनेमुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करीत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा पुतळा राज्य सरकारने उभारलेला नव्हता. तो नौदलाने चांगल्या हेतूने हा पुतळा उभारला होता. आम्ही नौदलाच्या मदतीने याही पेक्षा मोठा पुतळा पुन्हा उभारु. यावरुन कोणीही राजकारण करु नये, तो खुजेपणा आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा