DCM Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुकी महायुतीने प्रचंड बहुमत मिळवलं. महायुतीतील सर्वच मित्रपक्षांनी या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता महायुती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने आज यासंदर्भात मुंबईत बैठकही घेतली. या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीबाबत माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम्ही केलेल्या कामाचा थेट मुंबईकरांना फायदा झालाय

E

“आजची बैठक मुंबई महापालिका निवडणुकीसाठी होती. विधानसभेची निवडणूक महायुतीने मोठ्या मताधिक्क्याने जिंकली. लँड स्लाईड व्हिक्टरी मिळाली. न भुतो, न भविष्यती असा विजय झालाय. मुंबईचा विकास करायचा आहे. गेल्या अडीच वर्षांत सरकारने काम केलंय. कोस्टल काम, अटल सेतू, मेट्रोचं उद्घाटन, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, बीएमसीच्या रुग्णालयात सुधारणा केल्यात, याचा थेट फायदा मुंबईकरांना झालाय”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”

मुंबईबाहेर फेकल्या गेलेल्या मुंबईकराला मुंबईत आणणार

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय, त्याला पुन्हा मुंबईत आणायचं काम आम्ही करणार आहोत. याबाबतीत सर्व यंत्रणा काम करणार आहेत. म्हणून लाखो लोकांना हक्काचं घर देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण बैठक होती. महायुती पूर्ण ताकदीने विधानसभेप्रमाणे मुंबई पालिकाही लढणार आणि जिंकणार. मुंबईकरांना जशी मुंबई पाहिजे तशी मुंबई देणार आहोत”, असं आश्वासनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना दिलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm eknath shinde on mumbai municiple corporation election 2025 sgk