नरीमन पॉंईट येथील आकाशवाणी आमदार निवासात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. दासराव मोरे असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचे वय अंदाचे चाळीशीच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मृतदेह तपासणीसाठी जीटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी सातच्या सुमारास आकाशवाणी आमदार निवासातील खोली नं ५१५ मध्ये हा मृतदेह सापडला. परभणी जिल्ह्यातील वसमतचे आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नावावर ही खोली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मोरे यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की आत्महत्या याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही. मोरे हे कधीपासून आमदार निवासात राहत होते, ते कोणत्या कामासाठी मुंबईत आले होते, या सर्व गोष्टींची चौकशी सुरू आहे.

Story img Loader