मुंबई : अटल सेतूवर मोटरगाडी थांबवून सोमवारी समुद्रात उडी मारलेल्या बँकेतील उपव्यवस्थापक सुशांत चक्रवर्ती (४०) यांचा मृतदेह मंगळवारी नवी मुंबीतील जेएनपीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. मृतदेहाची ओळख पटली असून नवी मुंबई पोलीस अपमृत्यूची नोंद करून प्रकरण शिवडी पोलिसांकडे वर्ग करणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

सुशांत चक्रवर्ती यांनी अटल सेतवरून उडी माकल्याची माहिती शिवडी पोलिसांना मिळाली. शिवडी पोलिसांनी तपासणी केली असता अटल सेतूवरून समुद्रात उडी मारणाऱ्या व्यक्तीची लाल रंगाची मोटारगाडी (ब्रेजा) घटनास्थळी आढळली. ही मोटरगाडी सुशांत चक्रवर्ती यांची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चक्रवर्ती परळ येथे पत्नी व मुलीसोबत वास्तव्यास होते व फोर्ट परिसरातील हुतात्मा चौक येथील बँकेत उपव्यवस्थापक पदावर कार्यरत होते. पोलिसांनी तात्काळ चक्रवर्ती यांच्या पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावले आणि पतीबाबत माहिती घेतली. गेल्या काही दिवसांपासून चक्रवर्ती कामाच्या तणावाखाली होते, असे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी चक्रवर्ती यांचा मोबाइल संचही तपासला असून त्यात आत्महत्येबाबत कोणतीही माहिती सापडली नाही. चक्रवर्ती पत्नी व मुलीला शनिवारी लोणावळा येथे घेऊन गेले होते. तेथून परत आल्यानंतर सोमवारी सकाळी कामाला जात असल्याचे सांगून चक्रवर्ती घरातून बाहेर पडले. पण ते बँकेत न जाता शिवडी पोलिसांच्या हद्दीतील अटलसेतूवर गेले आणि त्यांनी तेथून समुद्रात उडी मारली.

Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
Shocking Video Udupi Man Tossed In Air
हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…
Accident News :
Accident News : कंटेनर कारवर पलटी होऊन भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Shocking video Suv overturned 8 times nagaur bikaner highway accident Live video
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा

हेही वाचा – Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाचा ‘लेडी लखोबा लोखंडे’ला दणका! लग्न न करताच पोटगीच्या नावाखाली तिघांना गंडा, जामीन फेटाळला

हेही वाचा – Badlapur : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी शाळा संचालक आणि सचिवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, उच्च न्यायालयाचा निर्णय

अटल सेतू नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची तपासणी केली असता ही घटना सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी घडल्याचे उघड झाले. घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले. त्यांनी स्पीड बोटच्या साह्याने चक्रवर्ती यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. चक्रवर्ती यांचा मृतदेह मंगळवारी जेएनपीटी समुद्र किनाऱ्यावर सापडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत यांनी दिली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण, हातातील अंगठी, मोटरगाडीची चावी व घड्याळ्यावरून मृतदेह चक्रवर्ती यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुटुंबियांना याबाबत कळवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader